esakal | एलन डिजिटलचे लाइव्ह कोर्स १ ऑक्‍टोबरपासून 
sakal

बोलून बातमी शोधा

allen digital

एलन डिजिटलच्या माध्यमातून बारावी उत्तीर्ण जेईई-मेन्स, प्रगत व मेडिकल- नीट विद्यार्थ्यांसाठी पूर्ण ऑनलाइन व डिजिटल कोर्स सुरू केले जात आहेत. असेही काही अभ्यासक्रम असतील जे ऑनलाइन नंतर ऑफलाइनमध्ये बदलता येतील.

एलन डिजिटलचे लाइव्ह कोर्स १ ऑक्‍टोबरपासून 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - एलन करिअर संस्था देशात प्रथमच लाइव्ह क्‍लास तसेच इंटरॲक्‍टिव्ह हॅपी लर्निंग क्‍लासेस सुरू करीत आहे. सर्वोत्कृष्ट शिक्षण साधनांसह हे वर्ग १ ऑक्‍टोबरपासून सुरू केले जाणार आहेत. तसेच २० ऑक्‍टोबरपासून इतर कोर्सेसही चालू होतील, अशी माहिती एलन संस्थेचे संचालक राजेश माहेश्वरी यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘गेल्या तीन दशकांत बेस्ट क्‍लासरूम ॲकेडेमिक्‍सच्या माध्यमातून एलनने अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या क्षेत्रात खास कामगिरी केली आहे. आता ही सर्वोत्कृष्ट पद्धत प्रत्येक विद्यार्थ्याला घरी बसून, उत्तम तंत्रज्ञानासह उपलब्ध होईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या काळातही एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना घरी यशस्वीरीत्या शिकवले गेले आहे. तसेच सध्या शिकवणे चालू आहे.’’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एलन डिजिटलच्या माध्यमातून बारावी उत्तीर्ण जेईई-मेन्स, प्रगत व मेडिकल- नीट विद्यार्थ्यांसाठी पूर्ण ऑनलाइन व डिजिटल कोर्स सुरू केले जात आहेत. असेही काही अभ्यासक्रम असतील जे ऑनलाइन नंतर ऑफलाइनमध्ये बदलता येतील. काही अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन असतील. इ-बोर्ड कोर्स  सीबीएसई बोर्डाच्या बाराaवीच्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. यासह सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एलन डिजिटलची वैशिष्ट्ये

लाइव्ह क्‍लासेसचे रेकॉर्डिंग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे ते पुन्हा सहज अभ्यास करू शकतील. 
रेकॉर्ड केलेले व्हिडिओ लेक्‍चर असतील. जे आयएचएल वैशिष्ट्यांवर (इंटरॲक्‍टिव्ह आणि हॅपी लर्निंग) आधारित असतील.
प्रत्येक विद्यार्थ्याला एक मार्गदर्शक मिळेल. 
शंकानिरसन करण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ दिला जाईल.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमानुसार त्यांच्याकडे प्रिंटेड आणि डिजिटल अभ्यासाचे साहित्य उपलब्ध असेल.
घरी असाईनमेंट दिली जाईल आणि त्यावर चर्चासत्र घेतले जाईल. 
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जाणून घेण्यासाठी विविध प्रकारच्या घटक चाचण्या तसेच, संपूर्ण विश्‍लेषणदेखील केले जाईल. 
शैक्षणिक, करिअर आणि मानसिक सल्लादेखील असेल.
प्रेरणादायक ठरतील असे वेबिनार वेळोवेळी प्रसारित केले जातील. 
पालक- शिक्षकांची बैठक आयोजित केली जाईल. 
विविध परीक्षांमध्ये ऑल इंडिया टॉपर्स विद्यार्थ्यांचे चर्चासत्र असेल.
ज्यांना केवळ एलनच्या एक्‍स्पर्ट शिक्षकांकडून शंकानिरसन करून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी एक विशेष ई-डाऊट सोल्यूशन बॅच सुरू केली जाईल.

loading image
go to top