Pune News : बँकेतील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी परवानगी द्या - अजित पवार

जिल्हा बँकेच्या सभेत अजित पवार यांची सहकारमंत्र्यांना सूचना
Allow recruitment of pdcc bank  Ajit Pawar dilip walse patil politics
Allow recruitment of pdcc bank Ajit Pawar dilip walse patil politicssakal

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (पीडीसीसी) कर्मचाऱ्यांच्या सुमारे ८०० जागा गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने, याचा बँकेच्या कामावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. जिल्हा बँकेने याबाबतची भरती प्रक्रिया सुरु केली होती.

परंतु ही प्रक्रिया सहकार खात्याच्या आदेशामुळे सध्या स्थगित आहे. मात्र सहकार खात्याने याबाबत नियमांच्या चौकटीत राहून त्वरित निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.१८) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केली.

जिल्हा बँकेची १०६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. या सभेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री दत्तात्रेय भरणे, बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे,

माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक रमेश थोरात, आमदार दिलीप मोहिते पाटील,अॅड. अशोक पवार, संजय जगताप, अतुल बेनके, राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदी यावेळी उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, ‘‘ गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सुमारे ८०० जागा रिक्त आहेत. बँकेने ही भरती प्रक्रिया सुरु केली होती. परंतु तांत्रिक कारण पुढे करत, सहकार खात्याने या भरतीला स्थगिती दिलेली आहे.

त्यामुळे ही भरती सहकार खात्याच्या परवानगीमुळे रखडली आहे. मात्र सहकारमंत्री वळसे पाटील येथे आहेत. त्यांनी या भरतीबाबत नियमांच्या चौकटीत राहून, त्वरित निर्णय घेतला पाहिजे.’’

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठीची कर्जाची मर्यादा वाढवून देण्याची मागणी केली आहे. या मागणीबाबत संचालक मंडळ निर्णय घेईल. परंतु, बॅँकेच्यावतीने सध्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि महिला बचत गटांना लघुउद्योगांसाठी सवलतीच्या व्याज दराने कर्ज पुरवठा करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकात बँकेच्या विविध उपक्रमांची आणि नव्याने सुरु करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. दिलीप वळसे पाटील यांचेही भाषण झाले. या सभेत बँकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

पत्रकारांना जाणीवपूर्वक टाळले

जिल्हा बँकेची सर्वसाधारण संपल्यानंतर भेटण्यासाठी वेळ देण्याबाबत निरोप पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला होता. या निरोपाला त्यांच्याकडून संमतीसुद्धा मिळाली होती.

परंतु हा कार्यक्रमातील पुरस्कार वितरण अर्धवट सोडून पवार हे अल्पबचत भवनाच्या दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडले. घाईघाईत गाडीत बसून निघून गेले. पवार इतक्या घाईत का बाहेर पडले, त्यांच्या या कृतीमुळे पवार यांनी ऐनवेळी पत्रकारांना का टाळले, याबाबतची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरु झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com