बारामतीतील व्यापारी म्हणताहेत, 'व्यवहार पूर्ववत करा'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

पूर्ववत होण्यास कालावधी गरजेचा

- नियमांचे पालन करण्याची व्यापाऱ्यांची तयारी

बारामती : शहर कोरोनामुक्त झालेले असल्याने आणि बारामती पॅटर्नच्या मदतीने कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश प्राप्त झाल्याने, आता बारामतीचे व्यवहार टप्याटप्याने का होईना पूर्ववत करावे, ही मागणी जोर धरु लागली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामती शहरात कोरोनाचा शेवटचा रुग्ण 14 एप्रिल रोजी सापडला होता. त्यानंतर आता तब्बल 25 दिवस उलटून गेल्यानंतर एकही रुग्ण आढळलेला नसल्याने आता ही साखळी तोडण्यात यश आल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या 50 दिवसांपासून ठप्प असलेले व्यापारचक्रही आता गतीमान करावे, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनचा कालावधी 31 मेपर्यंत वाढविण्याच्या चर्चांनी आता व्यापाऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी भाडेतत्त्वावर जागा घेऊन व्यवसाय सुरु केलेला आहे. भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, वीजबिल, इतर खर्च हे थांबलेले नाहीत. मात्र, दोन महिने व्यवसाय ठप्प असल्याने उत्पन्नच नसल्याने अनेक छोटे व्यापारी हवालदिल झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

किती काळ घरात बसून राहणार हा एकच प्रश्न सर्वांना सतावत आहे. लॉकडाऊन नेमके कधी संपणार याचे उत्तर कोणाकडेच नसल्याने ही अस्थिरतेची टांगती तलवार डोक्यावर घेत किती दिवस तग धरणार या चिंतेने सर्वांना ग्रासून टाकले आहे. 

पूर्ववत होण्यास कालावधी गरजेचा

दुकाने सुरु केल्यानंतरही लगेचच व्यवसाय सुरु होण्याची शक्यता नाही. ग्राहक जोपर्यंत दुकानात येऊन खरेदीस प्रारंभ करत नाहीत, तोवर अर्थकारण वेगाने फिरणार नाही. त्यामुळे या लॉकडाऊनचा फटका मोठा असेल, अशीही भीती सर्वांना सतावत आहे. कर्जाचे हप्ते, घरातील वस्तूंसाठी घेतलेल्या वस्तूंचे हप्ते, घरखर्च यांचा ताळमेळ कसा लावायचा असा प्रश्न सर्वांपुढेच आहे. 

नियमांचे पालन करण्याची व्यापाऱ्यांची तयारी

मास्क वापरणे, सॅनिटायझर्सचा वापर करणे, शारिरीक अंतर राखणे, कर्मचाऱ्यांचा मर्यादित वापर करणे, गर्दी होऊ न देणे, ठरलेल्या वेळेतेच दुकाने सुरु व बंद करणे असे सर्वच नियम पाळण्याची बारामतीच्या व्यापाऱ्यांची तयारी असल्याने आता दुकाने उघडण्यास परवानगी द्यायला हवी.

- नरेंद्र गुजराथी, अध्यक्ष, बारामती व्यापारी महासंघ, बारामती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allow to Selling demanded by Traders of Baramati