
प्रसाद कानडे
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर महिन्याकाठी सुमारे ४० बेवारस व्यक्ती मृतावस्थेत आढळून येतात. यात काही वेडसर तर काहींना घरातून हाकलून देऊन रेल्वेतून पाठविण्यात आलेले असते. बहुतांश व्यक्ती ज्येष्ठ असतात. काही मिळाले तर खातात, नाहीतर भुकेनेच प्राण सोडतात. फलाट, पार्किंग, पार्सल कार्यालयाचा परिसर या ठिकाणी मृतावस्थेत आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे.