
कोरेगाव भीमा : "पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन दिन कार्यक्रमासाठी पोलिस व स्वयंसेवकांसह सुमारे 10 हजार जणांचा फौजफाटा असणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सकारात्मक भूमिकेतून सहभागी व्हावे,'' असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या बंदोबस्ताचा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, अतुल झेंडे, श्रीनिवास घाडगे, उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील आदींनी आढावा घेतला. त्या वेळी राम बोलत होते.
खुशखबर! पुण्यातील हिंजवडीची वाहतूक कोंडी सुटणार
"पेरणे परिसरात 76 लाखांचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, थोड्याच दिवसांत महामार्गाचे नूतनीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे येथील विकासास खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे,'' असे जिल्हाधिकारी म्हणाले. डॉ. वारके यांनीही सर्व समाजबांधवांना मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
पुणे : बालभारती करणार दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन (व्हिडिओ)
अभिवादन कार्यक्रमास देशभरातून लोक येतात. त्या दृष्टीने लोणीकंद आणि शिक्रापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दहा अतिरिक्त पोलिस अधीक्षक, 32 पोलिस उपअधीक्षक, 121 पोलिस निरीक्षक, 308 सहायक पोलिस निरीक्षक, फौजदार, पाच हजार पोलिस कर्मचारी, 12 एसआरपीएफ कंपन्या (1320 जवान), 1200 होमगार्ड, 14 बीडीडीएस पथके; तसेच शांतिदूत व समता दलाचे स्वयंसेवक असा एकूण 10 हजार जणांचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते विजयस्तंभाजवळच्या हायमास्ट दिव्यांचे उद्घाटन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.