esakal | रयत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेस दिली 1500 झाडे
sakal

बोलून बातमी शोधा

रयत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेस दिली १५०० झाडे

रयत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेस दिली 1500 झाडे

sakal_logo
By
संदेश शहा

इंदापूर : इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या 1989 च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेस 1500 झाडे दिली असून त्यातील 300 झाडे लावण्यात आली. महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, कांदलगावचे सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब पाटील व आळेफाटा येथील प्राथमिक शिक्षिका सुरेखा गवारे (कुटे) यांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यांनी विद्यालय परिसरात देशी तीनशे झाडे लावत झाडांचे संवर्धन व संगोपन करण्याची हमी घेतली.

इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, गटनेते कैलास कदम, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर नगरपरिषद नोडल अधिकारीगोरक्षनाथ वायाळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, पर्यवेक्षक विजय शिंदे,शिक्षकसुनील मोहिते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.

यावेळी महाराष्ट्र राज्य एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये इंदापूर नगरपरिषदेने सलग तीन वेळा देश व राज्य पातळीवर मानांकन मिळवले. त्याचा तसेच या शाळेत शिक्षण घेतल्याचा आम्हा सर्वांना सार्थअभिमानआहे. यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या, प्रत्येक व्यक्तीने कुटुंबातील जवळच्या व्यक्तींचे वाढदिवस, लग्नवाढदिवस व इतर शुभप्रसंगी किमान दहा ते बारा झाडे लावून संगोपन करणे गरजेचे आहे. त्यामुळे शहर स्वच्छ, सुंदर व हरित होवून शहरवासीयांना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळेल.

हेही वाचा: पुणे : फुटपाथवरून अपहरण करून सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार

गटनेते कैलास कदम म्हणाले, मी सुद्धा या शाळेचा विद्यार्थी असून सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळा सबलीकरण करण्यासाठी सकारात्मक योगदान द्यावे. माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे म्हणाले, या माजी विद्यार्थ्यांचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम स्तुत्य व अनुकरणीय आहे. शिक्षक सुनील मोहिते म्हणाले, माजीविद्यार्थी शाळेस नेहमी सहकार्य करत असून त्यामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे.

सुरेश सोनवणे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा 2.0 अभियानात इंदापूर नगर परिषदेने भाग घेतला असूनअभियानातआपला सहभाग असावा तसेच शहरास मानांकन मिळावे या हेतूने आम्ही माजी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. यावेळी माजी विद्यार्थी संजय गानबोटे,सतीश तारगावकर, विजय बोडके, श्याम भोसले, राजू मणेरी, दत्तात्रेय ढावरे, श्री शिनगारे, अनिल साबळे, सुरेश व्यवहारे, मुमताज शेख, दिलीप पवार यांनी झाडे लावण्यासाठी योगदान दिले. सदर वृक्षारोपण करण्यासाठी झाडांचे रोपे शहा नर्सरी येथून मोफतमिळाली असून वृक्षमित्र वासुदेव शिरसट व चंद्रकांत देवकर, अशोक चिंचकर, शेखर लोंढे यांनी मोलाचे सहकार्य केले.

loading image
go to top