
पुणे : "नेहमी पत्नीचंच ऐका"; नागरिकाच्या ट्वीटला पोलीस आयुक्तांचं उत्तर
पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता (Amitabh Gupta) नेहमीच नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी प्रश्नांची उत्तरे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरच्या माध्यमातून देत असतात. मात्र, यावेळी त्यांनी नेमकं कोणत्या शहरात स्थायिक व्हावे या प्रश्नाचे उत्तर शोधताना द्विधा मनस्थितीत अडकलेल्या नागरिकाला नेहमी आपल्या पत्नीचे ऐका! असा अतिशय प्रेमळ सल्ला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्याची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. (Pune Police Commissioner Amitabh Gupta Tweet)
शहर पोलिसांच्या #LiveWithCPuneCity उपक्रमाचा भाग म्हणून आयुक्त गुप्ता यांनी अलीकडेच लोकांचे प्रश्न मागवले होते. त्यावेळी एका यूजरने गुप्ता यांना आपण मुंबईहून बंगळूरू येथे स्थलांतरित होण्याचा विचार करत आहे. मात्र, पत्नीला पुण्यात स्थलांतरीत होण्याची इच्छा आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न या नागरिकाने गुप्ता यांना विचारला. त्यावर उत्तर देताना गुप्ता म्हणाले की, "दोन्ही शहरे सुंदर आहेत, परंतु नियमांच्या पुस्तकात नेहमी तुमच्या पत्नीचे ऐका!' माझ्यासह प्रत्येकजण असेच करतो." असा सल्ला त्यांनी दिला.
हेही वाचा: काश्मीर पंडिताच्या हत्येतील दहशतवाद्यांचा खात्मा? बांदीपोरामध्ये सैन्याची कारवाई
बिनाहेल्मेटवाले बादशाह को भी...
यावेळी रस्त्यावर चुकीच्या बाजून वाहनं चालवणाऱ्या आणि हेल्मेटशिवाय वाहनं चालवणाऱ्या नागरिकांबाबत आणि रस्त्यावरील कमी असलेल्या पोलीस संख्येबाबत गुप्ता म्हणाले की, "तुम्हाला रस्त्यावर सर्वत्र पोलीस दिसत नसतील, परंतु ज्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे अशा लोकांवर आमचे पूर्ण नियंत्रण आहे. यावेळी त्यांनी बिनाहेल्मेटवाल्या बादशाहलादेखील हॉस्पिटलचा रस्ता बघावा लागतो असे म्हणत नागरिकांनी हेल्मेट वापरणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
Web Title: Always Listen To Wife Pune Police Commissioner Amitabh Gupta On Twitter Users Relocation Query
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..