पुण्यात आणखी एका MPSC उमेदवाराची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमर मोहिते

पुण्यात MPSC उमेदवाराची आत्महत्या

पुणे : पुण्यात आणखी एका MPSC परिक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमर मोहिते (Amar Mohite) असे आत्महत्या केलेल्या उमेदवाराचे नाव असून तो मूळचा सांगलीचा रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे. अमर पीएसआय फिजिकलची तयारी करत होता. (MPSC Student Suicide In Pune)

हेही वाचा: UP Election: 44 OBC, 19 SC अन्... वाचा भाजपचे जातीय समीकरण

मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द झाल्यामुळे अमर हा पीएसआयच्या (PSI Exam) फिजिकलमधून बाहेर पडला होता. तेव्हापासून तो तणावात (Pressure) होता. याच तणावातून त्याने आत्महत्या (Suicide) केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अमर हा पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात राहत होता.

अमर हा मूळचा सांगली येथील असून त्याचा भाऊ पिंपरी चिंचवड पोलीस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे समजते.

Web Title: Amar Mohite Mpsc Student Suicide In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :mpscsucide case
go to top