पुणे जिल्ह्यात अ‍ॅमेझॉन कंपनी डिलीव्हरी बॉय 3 दिवसांपासून संपावर

Amazon company delivery boy on strike for 3 days in Pune district
Amazon company delivery boy on strike for 3 days in Pune district
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्यात अ‍ॅमेझॉन कंपनी डिलीव्हरी बॉय संपावर गेले आहेत. जवळपास दहा हजार डिलीव्हरी बॉय गेल्या 3 दिवसांपासून संपावर आहेत. अ‍ॅमेझॉन मधील डिलिव्हरी असोसिएट्स, डिलिव्हरी बॉय यांच्यावर लादलेल्या आर्थिक व मानसिक पिळवणूकीसंदर्भात पुणे जिल्ह्यातील अनेक डिलीव्हरी बॉय सध्या आपल्या न्याय आणि हक्कासाठी संपावर आहेत. त्यांनी त्यांच्या आस्थापनेमधील सर्व कर्मचारी वर्गाशी याबाबत सखोल चर्चा केली असता त्यांच्यावर कंपनीकडून अन्याय होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे समजते. या सर्वांशी प्राथमिक चर्चा केली असता त्यांनी अ‍ॅमेझॉन कंपनीकडून मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

प्रस्तावित मागण्यांवर कंपनीने योग्य त्या प्रकारे विचार करून लवकरात लवकर त्यांची अंमलबजावणी करावी आणि या सर्व कामगार वर्गाला न्याय मिळेल असा निर्णय घ्यावा अशी विनंती या डिलीव्हरी बॉयकडून करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


काय आहेत मागण्या?
१.    व्हॅन 35 रुपये (व्हेरीयबल) प्रती पार्सल करावे.
२.    I.H.S. (छोटे पार्सल) 20 रुपये प्रती पार्सल करावे.
३.    I.H.S. (H.D) 25 रुपये प्रती पार्सलकरावे. 
४.    S.P. Biker 20 रुपये प्रत्येकी पाहिजे.
५.    व्हॅन (Productivity) 70-80 पाहिजे.
६.    Amflix (Productivity)  20-25 पाकीट ला ४८० रुपये द्यावे
७.    KYC आणि MAQ ही मार्केटिंगची कामे करणार नाही. 
८.    प्रत्येक असोसिएटला इन्शोरन्स क्लेम पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com