

An Amazon goods container overturned into a roadside ditch on the Pune–Nashik Highway near Narayangaon after the driver reportedly dozed off. The driver sustained minor injuries, while the vehicle and goods suffered major damage.
Sakal
नारायणगाव : चालकाला डुलकी लागली आणि ॲमेझॉन कंपनीचा माल वाहतूक करणारा कंटेनर महामार्गाच्या कडेला सुमारे पाच ते सहा फूट खड्ड्यात पलटी झाला. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. मात्र कंटेनर व साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास येथील पुणे नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्त्यावर झाली.