
Pune Students
sakal
पुणे : महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक निधीसाठीचा प्रस्ताव महापालिकेकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारकडून विविध विभागाअंतर्गत हा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे वसतिगृहाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार असला, तरीही पुनर्विकासाचे काम सुरू होण्यास आणखी बराच विलंब होण्याची शक्यता आहे.