esakal | आंबेगाव : सर्व शेतक-यांना डिजीटल स्वाक्षरी सातबारा मिळणार मोफत IPune
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव : सर्व शेतक-यांना डिजीटल स्वाक्षरी सातबारा मिळणार मोफत

आंबेगाव : सर्व शेतक-यांना डिजीटल स्वाक्षरी सातबारा मिळणार मोफत

sakal_logo
By
चंद्रकांत घोडेकर ः सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील सर्व शेतक-यांना सुधारीत नमुन्यातील डिजीटल स्वाक्षरी सात बारा २ ऑक्टोंबर ( महात्मा गांधी जयंती ) ते ८ ऑक्टोंबर दरम्यान मंडलनिहाय तलाठी कार्यालयांतर्गत मोफत घरपोच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सारंग कोडलकर व तहसिलदार रमा जोशी यांनी दिली. गाव निहाय वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यानुसार आंबेगाव तालुक्यामध्ये तलाठी सजा मुख्यालयाचे गावी येथे येत्या २ ऑक्टोंबरला सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत मोफत डिजीटल स्वाक्षरीत ७ /१२ वितरीत करणेत येणार आहे. हा कार्यक्रम २ ते ८ ऑक्टोंबर या कालावाधीत सजातील सर्व गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. तलाठी यांच्याकडे एकापेक्षा अधिक महसूली गावे असल्याने २ ऑक्टोंबर रोजी सजा मुख्यालयाच्या ठिकाणी व इतर गावांना त्यापुढील दिवशी ७ /१२ वाटप करण्याचे नियोजन केलेले आहे. त्यामध्ये एका खातेदारास एक वेळ मोफत डिजीटल स्वाक्षरीत ७/१२ उतारा वितरीत करण्यात येणार आहे.

२ ऑक्टोंबर रोजी आंबेगाव, कुशिरे बुद्रुक , डिंभे खुर्द ., तिरपाड, वचपे, तळेघर, घोडेगाव, आमोंडी, नारोडी, चास, शिनोली, पिंपळगाव तर्फे घोडा, मंचर, एकलहरे, पिंपळगाव तर्फे म्हळुंगे , पेठ, अवसरी खुर्द, भावडी, कळंब, महाळुंगे पडवळ, शिंगवे, अवसरी बुद्रुक , वळती, रांजणी, चांडोली बुद्रुक ., पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक., , निरगुडसर, धामणी, लाखणगांव, लोणी.

३ ऑक्टोंबर रोजी डिंभे बुद्रुक,., कुशिरे बुद्रुक,., मोपोली, डोण, अडिवरे, चिखली, काळेवाडी-दरेकरवाडी, फलकेवाडी, लांडेवाडी-पिंगळवाडी, कडेवाडी, फदालेवाडी-उगलेवाडी, साल, मोरडेवाडी, सुलतानपुर, चांडोली खुर्द , पारगांव तर्फे खेड, वायाळमळा, कुरवंडी, नांदुर, साकोरे, नागापूर, भागडी, जाधववाडी, खडकी, जारकरवाडी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, पहाडदरा, पोंदेवाडी, खडकवाडी.

हेही वाचा: शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीतील हक्काची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा

४ ऑक्टोंबर रोजी महाळुंगे तर्फे घोडा, दिग्गद, मेघोली, सुपेधर, न्हावेड, पांचाळे बुद्रुक, राजपूर, गवारवाडी, चिंचोली, चिंचोडी, ठाकरवाडी, कानसे, तळेकरवाडी, निघोटवाडी, वडगाव काशिंबेग, श्रीरामनगर, शिंदेमळा, कारेगांव, विठ्ठलवाडी, थोरांदळे, लौकी, टाव्हरेवाडी, जवळे, शिरदाळे, काठापूर बुद्रुक ., रानमळा.

५ ऑक्टोंबर रोजी कोलतावडे, महाळुंगे तर्फे आंबेगाव, गोहे बुद्रुक, नानवडे, पांचाळे बुद्रुक ., गाडेवाडी, कोलदरा-गोनवडी, गिरवली, शेवाळवाडी-लांडेवाडी, आंबेदरा, शेवाळवाडी, वाळुंजवाडी, भोरवाडी, कोल्हारवाडी, टाकेवाडी, भराडी, देवगांव, वाडगावपीर.

६ ऑक्टोंबर रोजी फुलवडे, सावरली, पाटण, गोहे खुर्द , कोंढरे, माळीण, कोंढवळ, निगडाळे, धोंडमाळ-शिंदेवाडी, रामवाडी, पोखरकरवाडी, खडकमळा, थुगांव, मांदळेवाडी.

७ ऑक्टोंबर रोजी बोरघर, साकेरी, पोखरी, आहुपे, आमडे, आसाणे, तेरूंगण, जांभोरी, कोळवाडी-कोटमदरा, बाभुळवाडी, तांबडेमळा.

८ ऑक्टोंबर रोजी वरसावणे, पिंपरी पारग, राजेवाडी, आगाणे, पिंपरगणे, मेनुंबरवाडी, कळंबई, नांदुरकीची वाडी, फलोदे, ढाकाळे.

या कार्यक्रमामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून, सर्वांनी मास्क लावून कार्यक्रम पार पाडणेच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत .तसेच मोफत ७/१२ वितरणावर सनियंत्रण करणेकामी गावनिहाय नोडल ऑफिसर यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक खातेदाराला वाटप केलेल्या डिजीटल स्वाक्षरीत ७/१२ मध्ये काही त्रुटी किंवा विसंगती असल्यास खातेदाराचा अभिप्राय त्यांचेकडून प्राप्त करून घेऊन पुढील कालावधीत त्याची पूर्तता करणेबाबत तलाठी व मंडल अधिकारी यांना सूचना दिल्या असल्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.

loading image
go to top