esakal | Ambegaon: भीमाशंकर करणार दहा लाख टनाचे गाळप
sakal

बोलून बातमी शोधा

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना

आंबेगाव : भीमाशंकर करणार दहा लाख टनाचे गाळप

sakal_logo
By
सुदाम बिडकर

पारगाव : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या चालू गाळप हंगामात दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे नियोजन केले असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री व भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांनी दिली. पारगाव ता. आंबेगाव येथील भीमाशंकर साखर कारखान्याच्या 22 व्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन व गळीत हंगामाचा प्रारंभ आज रविवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, भीमाशंकरचे माजी अध्यक्ष व बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवान वाघ, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे व संचालक बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, दगडू मारुती शिंदे, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात, आण्णासाहेब पडवळ, भगवान बो-हाडे, तानाजी जंबूकर, ज्ञानेश्वर अस्वारे, रमेश कानडे, रमेश लबडे, कल्पना गाढवे, मंदाकिनी हांडे उपस्थित होते. बॉयलर अग्नी प्रदीपन तज्ञ संचालक किसन उंडे व कविता किसन उंडे यांच्या हस्ते तर गव्हाण पूजन संचालक अक्षय काळे व रुपाली अक्षय काळे यांच्या हस्ते झाले.

हेही वाचा: नागपूर : दसरा, दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेल भडकणार

श्री. बेंडे प्रस्ताविक करताना म्हणाले गेली दोन वर्ष कोरोनाने त्रस्त असतानाही मागील हंगामात कारखान्याच्या इतिहासातील सर्वात जास्त गाळप करून कारखाना विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले यावर्षीच्या २०२१-२२ गाळप हंगामात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यादुष्टीने कारखान्याने नियोजन केले आहे दसरा सणानंतर उसतोडणी कामगारांच्या टोळ्या कारखानास्थळावर दाखल होतील १५ ते २० आक्टोंबर तारखेच्या दरम्यान प्रत्यक्षात ऊस गाळपाला सुरुवात होईल असे सांगितले. श्री. वळसे पाटील पुढे म्हणाले मागील गाळप हंगामाचे वर्ष साखर कारखानदारीच्या दृष्टीने आव्हानाचे वर्ष होते एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे ऊस क्षेत्र वाढल्याने शेतकर्यांच्या अपेक्षा होत्या ऊस लवकर तोडला जावा कारखान्याच्या अपेक्षा असतात.

कारखाना कमी दिवस चालून गाळप जास्त व्हावे त्या करिता भिमाशंकरने मशनरीचे विस्तारीकरण केले मागील गाळप हंगामात विक्रमी नऊ लाख ७० हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्याने चालू गाळप हंगामात सरासरी दररोज सात हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेने दहा लाख मेट्रिक तन ऊस गाळपाचे नियोजन केले साखर उद्योगासाठी मागील दोन तीन वर्ष अडचणीचे गेले देशात व जगात साखरेचे उत्पादन वाढले त्यामुळे देशातील साखरेला उठाव नसल्याने साखर गोदामात पडून राहिली त्यामुळे त्यावरील कर्ज व व्याज वाढत गेले त्यातच कारखान्यांना तोट्यात साखर विकावी लागली.

हेही वाचा: इंदापूर : उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग सुरू

त्यामुळे कारखान्याच्या नुकसानीत वाढ झाली आता परिस्थिती सुधारली आहे आतरराष्ट्रीय बाजारात साखरेला चांगला दर मिळेल त्यादृष्टीने कच्ची साखर निर्मितीचे नियोजन करावे लागेल, भीमाशंकर डीस्टलरी व इथेनॉल प्रकल्प सुरु करण्याबरोबर वीज निर्मिती प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेणार आहे. भीमाशंकर कामगारांना दिवाळीसाठी २० टक्के बोनस द्देणार असल्याचे त्यांनी सांगितले सूत्रसंचालन अनिल बोंबले यांनी केले तर आभार उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे यांनी मानले

loading image
go to top