

Pickup Accident at Pokhari Ghat
Sakal
मंचर : भाविक पिकअप गाडीतून मंचर घोडेगाव मार्गेभीमाशंकर येथे दर्शनासाठी जात असताना पोखरी घाटात एका मोटरसायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा पिकअपवरील ताबा सुटला आणि गाडी पलटी झाली. मोटरसायकलस्वार मात्र सुखरूप बचावला. स्थानिक ग्रामस्थांनी व रस्त्यावरून येजा करणाऱ्यांनीजखमींना तत्काळ घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारा साठी दाखल केले. त्यानंतर सरकारी रुग्णवाहिकेतून मंचर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.