Pune : आंबेगाव परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई ; ११५०० चौरस फूट बांधकाम जमिनोदोस्त

अनधिकृत बांधकामे करून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक
pune
punesakal

पुणे :आंबेगाव बुद्रुक परिसरातील सर्व्हे नं. ३६ आणि ४६ तसेच आगम मंदिर सर्व्हे नं.६६ मधील अनधिकृत बांधकामावर शहर बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून यात ११५०० चौरस फूट अवैध बांधकाम जमिनोदोस्थ करण्यात आले आहे.

pune
Pune News : आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील 55 महा-ई सुविधा केंद्र शनिवारी व रविवारी सुरू राहणार - गोविंद शिंदे

आंबेगाव परिसरात चालू असलेल्या अवैध बांधकामांना शहर बांधकाम विभाग झोन क्र २ च्या वतीने नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या तरीही सदरील सर्व्हे नंबर मधील बांधकाम चालू होते.त्यानंतर ,शहर बांधकाम विभाग झोन क्र २ च्यावतीने सुरू असलेल्या अवैध बांधकामावर धडक कारवाई करण्यात आली.

pune
Pune Crime : देशभरात विविध एटीएम मधून पैसे चोरणाऱ्यांना इंदापूर पोलिसांनी केले पंजाबमधून दोघांना अटक

बांधकाम विकास विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख,कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता प्रवीण भावसार,शाखा अभियंता प्रशांत मोरे,अभिजित भुजबळ ,अमोल पुंडे यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात सदरील कारवाई केली.

सदरील कारवाईने परिसरात अनधिकृत बांधकामे करून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अवैध व्यवसायिकांनी पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

मनपा परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे बांधून स्वतःचे नुकसान करू नये.अनधिकृत बांधकामांना पाठीशी न घालता धडक आणि नियमित कारवाई होणार असल्याचे शाखा अभियंता अभिजित भुजबळ यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com