

Free Indigenous Seeds Distributed to 1101 Farmers in Ambegaon Covering 303 Acres Under Drought Resilient Farming Initiative
esakal
मंचर : दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक नियोजनासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच देशी बियाण्यांचे संवर्धन आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ (महाराष्ट्र जीन बँक प्रकल्प), नागपूर व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था, मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आंबेगाव तालुक्यात रब्बी हंगामासाठी एक हजार १०१ शेतकऱ्यांना ३०३ एकर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी हप्सरा ज्वारी, काळा गहू, खपल्या व बक्षी गहू, काळा वाटाणा व १७ प्रकारचा भाजीपाला आदी विविध प्रकारच्या देशी बियाण्यांचे जीन बँकेच्या माध्यमातून दोन हजार ९५ किलो मोफत वाटप करण्यात आले आहे.