

Maharashtra Rain Update Dimbhe Dam Water Release Increased Ghod River Villages Asked to Stay Alert
esakal
-डी. के. वळसे पाटील
मंचर : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी (ता. ३१) दुपारी १ वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात १० हजार ९८८ क्युसेक वाढ करण्यात आली.