esakal | Ambegaon : ...आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले
sakal

बोलून बातमी शोधा

आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले

आंबेगाव : ...आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले

sakal_logo
By
किशोर गरड

आंबेगाव बुद्रुक : कात्रज येथील साई स्नेह हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ऍडव्होकेट कल्याण शिंदे आपल्या मित्रांसह गेले होते. दरम्यान,एक साधारण दहा वर्षाचा मुलगा रस्त्यावर रडत काही तरी शोधत असल्याचे त्यांना दिसला. हा मुलगा असं का करतोय त्याची उत्सुकता लागल्याने ऍडव्होकेट शिंदे यांनी त्या मुलाला हाक मारून जवळ बोलाविले आणि विचारणा केली असता त्याचे शंभर रुपये हरवले असल्याचे त्याने सांगितले.

रडण्याचे कारण विचारले असता जे उत्तर त्याने दिले ते धक्कादायक होते. त्याच्या खिशात एकूण एकशे तीन रुपये होते. पैकी तीन रुपयांचे त्याने चॉकलेट घेतले होते. तर उर्वरित शंभर रुपयांच्या त्याला वह्या विकत घ्यायच्या होत्या. त्यामुळे तो इतका रडत होता. त्याचे आई वडिल सिग्नलवर,रस्त्यावर स्टिकर,पोस्टर्स,किचेन वगैरे विकतात.असेही त्याने सांगितले. त्याची शिक्षणाप्रती असणारी असुया पाहून ऍडव्होकेट शिंदे आणि त्यांच्या मित्रांनी त्याला प्रथम स्टेशनरीच्या दुकानात नेवून शैक्षणिक साहित्यासह दप्तर विकत घेतले.शेजारीच असणाऱ्या कपड्यांच्या दुकानातून एक ड्रेस विकत घेतला तर दुकानदाराने शिंदे आणि त्यांच्या मित्रांचा या आगळ्या वेगळ्या माणुसकीचा आधार म्हणून स्वतः कडूनही एक ड्रेस दिला. त्या इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या निरागस मुलाचं नाव होतं भीमा. शैक्षणिक साहित्यासह कपडेही मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावरील रडू जाऊन हसू उमटले.

हेही वाचा: असंघटित कामगारांनी ‘ई-श्रम पोर्टल’ वर नोंदणी करावी : नीमा अरोरा

ॲड कल्याण शिंदे, दिलावरसिंह गिरासे, प्रकाश बेदरे, सुरेश कदम,विजय नलवडे या मित्रांनी मिळून केलेली मदत ही लखमोलाची आहे. अशाच सहृदयी,सेवाभावी वृत्ती आणि शिक्षण प्रेमी नागरिकांनी एक पाऊल पुढे येऊन भीमा सारख्या असंख्य शिक्षणरुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन शिक्षणाची गंगा प्रत्येका पर्यंत पोहचवायला हवी.

गरीब कुटूंबात जन्म झाला म्हणून निदान लहाणपणी तरी दारिद्रयाचा सामना करावा लागतो. गरीबी दूर व्हावी यासाठी आवश्यक मुलभुत शैक्षणिक साधने व गुणवत्तापूर्वक शिक्षण गरिब मुलांना प्राप्त होत नसल्याने ते या गरीबीच्या चक्रात अडकतात. अशा मुलांना गुणवत्तापूर्वक शिक्षण उपलब्ध करुण देण्याची जबाबदारी राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेने स्विकारल्यास निश्चितच सुशिक्षीत पिढी निर्माण होवून त्यांचे पुढील आयुष्य सुखमय बनु शकते.

loading image
go to top