आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, हवेली तालुक्यात शिवसेना उद्या आंदोलन करणार कारण... 

डी. के. वळसे पाटील
Tuesday, 15 September 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लागू केली. त्यातून काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला. या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, हवेली या तालुक्यांच्या तहसीलदार कचेरीवर बुधवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता आंदोलन केले जाणार आहे.

मंचर (पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लागू केली. त्यातून काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला. या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, हवेली या तालुक्यांच्या तहसीलदार कचेरीवर बुधवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता आंदोलन केले जाणार आहे. कांदा उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत आढळराव पाटील यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेसाहेब हे सतत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा निर्णय घेतात. पण, शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळायला लागले, तर मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी जाहीर केली. त्यातून केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचे अधोरेखित झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

“मुजोर केंद्र सरकारला वठणीवर आणण्यासाठी व निर्यातबंदी उठविण्याठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनात शिवसैनिक व शेतकरी बांधवांनी प्रमाणित मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करून उपस्थित रहावे,”असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ambegaon, Khed, Junnar, Shirur, Haveli talukas Shiv Sena agitation tomorrow