पुणे - शहर पोलिस आयुक्तालयातील आंबेगाव पोलिस ठाण्याने आयएसओ ९००१: २०१५ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानांकनाचा बहुमान मिळवला आहे. हे सन्मान प्राप्त करणारे पुणे पोलिस आयुक्तालयातील पहिलेच पोलिस ठाणे ठरले आहे. नागरिकांना अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि दर्जेदार सेवा देण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.