

Rajshree Bhagwat honoured by Devendra Fadnavis for 15 years of free rangoli service during Pandharpur Wari
Sakal
पारगाव : आंबेगाव तालुक्यातील नारोडी गावच्या राजश्री नितीन भागवत या गेली एक तपाहून अधिक तब्बल १५ वर्षे आळंदी ते पंढरपूर माऊलींच्या रथा समोर पालखी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्याचे विनामुल्य सेवा करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी एकादशीला पंढरपूर ला दर्शनाला आले असता त्यांनी राजश्री भागवत यांचा सत्कार करून कौतुक केले आहे.