

Illegal Tree Felling Case | Two Arrested in Ambegaon Reserved Forest
esakal
निरगुडसर : वळती (ता.आंबेगाव)येथील राखीव वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी मंचर वनपरिक्षेत्राच्या पथकाने मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वळती येथील राखीव वन कक्ष क्रमांक २४२ मधील गट क्रमांक ८९७ मध्ये कडुलिंब प्रजातीची सात आणि बाभूळ प्रजातीची दोन अशी एकूण नऊ झाडे अज्ञात व्यक्तींनी अवैधपणे तोडल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला होता.