

Focus on Education, Health Services and Technical Infrastructure
Sakal
मंचर : “ नागपूर विधिमंडळ आधिवेशनात सन २०२५-२६ पूरक मागण्या अंतर्गत आंबेगाव–शिरूर विधानसभा मतदारसंघात सात विविध विकासकामांसाठी ४९ कोटी ८९ लाख ६७ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.शिक्षण, आरोग्य, तांत्रिक पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांमध्ये कामांची अंमलबजावणी जलदगतीने सुरू होईल.” अशी माहिती राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे–पाटील यांनी दिली.