

मुंबई येथील राज्यपालांचे निवासस्थान राजभवन येथील ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये अधिकाऱ्यांसमवेत आंबेगाव सुपर 23 चे विद्यार्थी.
Sakal
घोडेगाव : पंचायत समिती आंबेगाव शिक्षण विभाग, आयुका वेधशाळा गिरवली व आयुका पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, मोरडे फुड्स प्रा. ली. मंचर यांच्या सहकार्याने आंबेगाव सुपर 23 उपक्रमातील यशस्वी 23 विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांची वैज्ञानिक सहल मुंबई येथे नेण्यात आली होती. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा. त्यांच्यातील जिज्ञासू, तसेच चौकस वृत्तीला आणि कल्पकतेला वाव मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश होता.