ऐकावं ते नवलच! वॉकी टॉकी वापरून दारूची विक्री; पोलिसांनी टाकला छापा

In Ambegaon taluka FIR Filed against three for selling liquor with the walkie talkie
In Ambegaon taluka FIR Filed against three for selling liquor with the walkie talkie
Updated on

लोणी काळभोर (पुणे) : अवैध धंद्यांवर कारवाई होत असल्याने, पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी भावडी (ता. आंबेगाव) येथील एका हॉटेल चालकाने वॉकी-टॉकीच्या सहाय्याने देशी-विदेशी दारुची विक्री करण्याचा अनोखा फंडा सुरु केला होता. मात्र जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेने शुक्रवारी (ता. ९) संबधित हॉटेलवर छापा टाकून, दोन वॉकी-टॉकीसह एक लाख सत्तर हजार रुपयांचा देशी-विदेशी दारुचा साठा जप्त केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉकी-टॉकीच्या सहाय्याने देशी-विदेशी दारुची विक्री करण्याऱ्य़ा भावडी (ता.आंबेगाव) येथील मनोरंजन हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली असुन, या प्रकरणी हॉटेल मनोरंजनचे मालक निलेश बबन काळे व संतोष बबन काळे व नीता निलेश काळे (रा. तिघेही, भावडी ता. आंबेगाव) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्हात मागील कांही दिवसापासुन मटका, जुगार, बेकायदा दारु विक्री या सारख्या अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या माध्यमातून कारवाई सुरु आहे.

डीएसके प्रकरण : फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट कोर्टात दाखल करा; वकिलांनी केली मागणी

स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे व त्यांचे सहकारी शुक्रवारी मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना, भावडी गावच्या हद्दीतील मनोरंजन या हॉटेलमध्ये वॉकी-टॉकीच्या सहाय्याने देशी-विदेशी दारुची विक्री होत असल्याची माहिती मांजरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे रविंद्र मांजरे व मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या पथकाने मनोरंजनवर छापा टाकला असता, पोलिसांना दोन वॉकी-टॉकी व एक लाख सत्तर हजार रुपयांचा दारुचा साठा आढळुन आला. पोलिसांनी दोन वॉकी-टॉकीसह एक लाख सत्तर हजार रुपयांचा देशी-विदेशी दारुचा साठा जप्त केला असुन, पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.

खेडचे माजी आमदार गोरे यांचे कोरोनामुळे निधन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com