

Teachers’ unions from Ambegaon Taluka prepare for a massive protest in Pune
Sakal
मंचर : “आंबेगाव तालुक्यातील २८२ प्राथमिक व माध्यमिक शाळेतील एक हजार १५० शिक्षक विविध मागण्यांकडे राज्यशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता.५) रोजी रजेवर जाणार असून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चा ची जय्यत तयारी झाली आहे.”अशी माहिती आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर व सरचिटणीस सुनील भेके यांनी दिली.