
जलवाहिन्या नसल्याकारणाने एका सोसायटीला दरमहा साधारण सव्वा लाख रुपये देऊन पाणी विकत घ्यावे लागते आहे.
दत्तनगर पुणे : पुणे महानगरपालिकेत आंबेगाव बुद्रुक ग्रामपंचायत समाविष्ट होऊन तीन वर्षे लोटली तरीही आंबेगाव बुद्रुक मधील दभाडी परिसरातील रहिवाशांना महापालिकेकडून पाणी मिळत नसल्याची खंत आंबेगावकर करताना दिसत आहेत.
आंबेगाव बुद्रुक परिसरातील सर्व्हे नंबर ५ ते १६ मधील जवळ जवळ सर्वच सोसायट्यांपर्यंत महानगरपालिकेच्या जलवाहिन्या पोहोचलेल्या नाहीत. लोकसभा निवडणुकांच्या निवडणुकांपासून काही सोसायट्यांना दिवसाआड पिण्याच्या पाण्याचे टँकर महापालिकेकडून दिले जातात. परंतु, या परिसरातील सोसायट्यांचा विचार करता एका सोसायटीमध्ये शंभरच्या वर सदनिका आहेत. एका टँकरमधील पाणी आम्ही दोन दिवस पुरवणार कसे? असे नागरिक म्हणत आहेत.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जलवाहिन्या नसल्याकारणाने एका सोसायटीला दरमहा साधारण सव्वा लाख रुपये देऊन पाणी विकत घ्यावे लागते आहे. स्थानिक प्रशासन आणि इतर पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर वाल्यांचे साटेलोटे तर नाही ना असा प्रश्न आंबेगावकर उपस्थित करत आहेत. आरटीआय, अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, स्थानिक नगरसेवकां समोरही अर्ज विनंत्या करूनही दभाडीतील नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते आहे.
आम्ही नियमित कर भरतो.नियमांचे पालन करतो. तरीही, प्रशासनाकडे प्रश्न विचारले असता उत्तरे दिली जात नाहीत. दरमहा लाखो रुपये फक्त पाण्यावर खर्च होत आहेत.
अनिल महाजन, चेअरमन साई अमराई सोसायटी.
दाभाडी परिसरात जलवाहिन्यांची नेटवर्क डेव्हलपमेंट चालू आहे. साधारण एका वर्षात हे काम पूर्ण होईल.
राजेश गुर्रम, उपअभियंता, स्वारगेट पाणीपुरवठा विभाग.
हे वाचा - नाना पेेठेतील टोळक्याची दहशत! दुकानात घुसून तरुणावर कोयत्याने वार
परिसरातील नागरिकांची तहान केव्हा भागणार अशी रहिवाशांची स्थिती झाली आहे. मूलभूत सुविधाही मिळत नाहीत,पाणी नाही,रस्ते नाहीत अशात आम्ही प्रश्न मांडायचे कुठे आणि कुणाकडे असे त्रस्त सवाल नागरिक करत आहेत.
भारतीय जनता पार्टीने गावांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे कामे झाली नाहीत. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामाचे योग्य नियोजन करता आले असते.
अरुण राजवाडे, भाजपा पदाधिकारी व माजी सरपंच आंबेगाव बुद्रुक