

Long-awaited sewer project in Vasuli Fata finally starts
sakal
आंबेठाण : नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या वासुली फाटा ते वासुली गाव ( ता.खेड ) या दरम्यानच्या सांडपाणी योजनेला अखेर मुहूर्त मिळाला असून एमआयडीसीच्या माध्यमातून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.या भागात मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती झाली होती परंतु सांडपाणी योजना नसल्याने सांडपाणी मुख्य रस्त्यावरून धावत होते.त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि रोगराईचा सामना करावा लागत होता.परंतु अखेर या कामाला सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिकांसह प्रवाशांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे.