
आंबेठाण : बुधवारनंतर (ता.१६ ) चाकण ते वासुली फाटा (ता.खेड ) हा रस्ता स्थानिक नागरिक गावोगावी बंद करणार आहे.दररोजची वाहतूककोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर आम्ही आंदोलन करणार असून आमचे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने आहे. चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोन बंद पडला तरी चालेल.दररोजच्या वाहतूककोंडी विरोधात महिला, विद्यार्थी, शेतकरी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत.आता आम्ही अन्याय सहन करणार नाही.या रस्त्यावरून एमआयडीसीची अवजड वाहतूक होऊ देणार नाही असा एल्गार चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोन मधील गावांतील नागरिकांनी पुकारला आहे.