पुणे - आंबिल ओढा इथं आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे - आंबिल ओढा इथं आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे - पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करत असताना स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले आहेत. कारवाईला विरोध करत आंबिल ओढा इथं आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली आहे. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईचा निषेध करताना एकता परिषदेचे अध्यक्ष किशोर कांबळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. खासगी बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट असल्याचा आरोप किशोर कांबळे यांनी केला आहे.

किशोर कांबळे यांनी म्हटलं की, पावसाळ्यात वेळोवेळी घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडत असतानाही नाले बुजविण्याचे प्रकार अद्याप थांबले नसल्याचे पुढे आले आहे. पावसाचे पाणी नैसर्गिकपणे वाहून नेणारे ओहोळ, नाले बुजविण्याची किमया होत असल्याने कधी नव्हे ते रस्त्या-रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहिल्याचा अनुभव पुणेकरांना घ्यावा लागला आहे. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पक जाहीर करून पालिकेने आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातला आहे. खाजगी बिल्डरच्या आर्थिक फायद्यासाठी आंबिल ओढ्याची मोक्याची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचे कट कारस्थान प्रशासन आधिकारी स्थानिक लोकप्रतिनीधी करत असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी नाराज झाले आहेत. या सर्व प्रकारच्या निषेधार्थ बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष किशोर कांबळे यांनी आत्मदनाचा प्रयत्न केला आहे.

कायद्यातील या तरतुदीनुसार आंबिल ओढ्यासारख्या मोठ्या ओढ्यांच्या कडेने महापालिका आणि हद्दीलागतच्या भागात दोन्ही बाजूस ९ मीटर रुंदीचा ग्रीनबेल्ट ठेवणे बंधनकारक केले आहे. मात्र, आंबिल ओढ्याच्या कडेने नऊ मीटर ग्रीनबेल्ट सोडाच, ओढ्यातच भर टाकून अनेक ठिकाणी बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे आंबिल ओढ्याची मूळ वहनक्षमता जवळपास साठ टक्क्यांनी कमी झाली आहे. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पक जाहीर केला असल्याचं ते म्हणाले.

पुणे - आंबिल ओढा इथं आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
ठेकेदारासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करून मानकांनाही फाटा

पुण्यात २५ सप्टेंबर २०१९ ला ओढ्याने अचानक रौद्र रुप धारण केलं. त्याचं नेमकं कारण म्हणजे विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाची अक्षरशः लचके तोड केली आहे. कोणी डोंगर पोखरले, तर कोणी ओढ्यात भर टाकली, काही ठिकाणी प्रवाह वळवला. या पार्श्वभूमीवर त्या दिवशी रात्री दोन-तीन तासांमध्ये धुवाधार पाऊस कोसळला. विकासाची सूज आलेल्या शहरातून हे पावसाचे पाणी वाहून जायला जागा होती तरी कुठे, भविष्यात असाच पाऊस पुन्हा झाल्यावर शहरानं पुन्हा बुडायचंच का हे प्रश्‍न पुणेकरांना आज पडलेच पाहिजेत असंही किशोर कांबळे यांनी म्हटलं.

किशोर कांबळे म्हणाले कि, शहर वेगाने विस्तारत असताना या प्रक्रियेत नैसर्गिक नाले व ओहोळ एका मागोमाग एक लुप्त होत असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. सिमेंट क्रॉक्रिटचे जंगल फोफावत असुन त्यात नैसर्गिक घटकांची जपवणूक करण्याचे दायित्व लक्षात घेतले गेले नाही. इतके सारे घडूनही आजही नाले बुजविण्याचे उद्योग थांबले नसल्याचे अधोरेखीत होत आहे. गंभीर बाब म्हणजे, ही किमया एखाद्या बांधकाम व्यावसायिकाप्रमाणे खुद्द महापालिका विकासाच्या नावाखाली करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com