...आता ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांनाही मिळणार रुग्णवाहिकेचा दर्जा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने उपलब्ध व्हावा, यासाठी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

पुणे - मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने उपलब्ध व्हावा, यासाठी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहर आणि ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा अखंडीतपणे होण्यासाठी ऑक्सिजन वाहतूक करणारे टॅंकर विनाअडथळा रुग्णालयापर्यंत पोचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनाच्या संशयामुळे दुरावली गावकी अन् भावकी; कुटुंबातील महिलांनीच दिला मग ज्येष्ठाला खांदा  

ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टॅंकर्सवर सायरन आणि जीपीएस यंत्रणा बसविण्यात यावी‌‌. याबाबत प्रादेशिक परिवहन विभाग यांनी खात्री करावी.

- पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त तसेच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांनी ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टँकर्सना वाहतूकीचा अडथळा होऊ नये याकरीता तात्काळ मार्गिका खुल्या करुन देण्याबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना   द्याव्यात. 
- ऑक्सिजन वाहतूक 
करणाऱ्या टँकर चालकांची तीन शिफ्टमध्ये नियुक्ती करावी.
- अत्यावश्यक सेवेचे ऑक्सिजन वाहतुकीबाबतचे फलक वाहनाच्या दर्शनी भागावर लावावेत.
- टोलनाका व्यवस्थापकांनी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टॅंकर्सना स्वतंत्र खुल्या मार्गिका उपलब्ध कराव्यात.
- सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून अडथळारहित वाहतूक सुरू ठेवावी
- आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाई.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambulance status to vehicles supplying oxygen