कोरोनाच्या संशयामुळे दुरावली गावकी अन् भावकी; कुटुंबातील महिलांनीच दिला मग ज्येष्ठाला खांदा  

khedkar.jpg
khedkar.jpg

तळेगाव ढमढेरे (पुणे) : कोरोनाच्या संशयामुळे भावकी आणि गावकी दुरावली, तरी कोरोना न झालेल्या आजोबांचा शेवटचा प्रवास गावातच व्हायला हवा, ही नातीची जिद्द. त्यातूनच तिने पुढाकार घेत आई, काकू आणि दोन आत्यांच्या मदतीने आजोबांवर अंत्यसंस्कार केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिरुर तालुक्‍यातील रांजणगाव गणपती येथील देवाचीवाडीतील नामदेव सखाराम खेडकर (वय 82) यांचे नुकतेच गावातील खासगी दवाखान्यात हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. नामदेव यांना कोरोना झाला असेल, या भीतीने त्यांचे नातेवाईक जवळ जाण्यास टाळाटाळ करू लागले. त्यांच्या दोन्ही मुलांचा, तसेच जावयाचाही यापूर्वी मृत्यू झालेला. त्यामुळे घरात कर्ता पुरुष नाही. नातवंडे लहान, दोन सुना, दोन लेकी आणि एक नात. भावकी आणि गावकीतला एकही माणूस दवाखान्यात फिरकेना. अशा वेळीस वडिलांचा अंत्यविधी कसा होणार, असा लेकींना प्रश्न पडला, तर सासऱ्यांनी आयुष्यभर कष्ट करून संसार केला, पण त्यांच्या अंत्यविधीला खांदा देण्यासाठी भावकीतील चार जणही पुढे येत नसल्याने सुनांचाही नाईलाज झाला.

सुमारे 8 तास नामदेव यांचा मृतदेह दवाखान्यात पडून होता. काही जवळचे नातेवाईक आले पण कोरोनाच्या संशयामुळे अंत्यविधी गावात न करता दुसरीकडे करण्याचा सल्ला देऊ लागले. परंतु नातीने (मुलीची मुलगी) निर्णय घेतला की काहीही झाले तरी आजोबांचा अंत्यविधी गावातच करायचा. पण अडचण एक होती की आजोबांचा कोरोना अहवाल कळणार कसा? रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत देवदूत बनून धावून आले. त्यांनी संबंधित डॉक्‍टरांना मृत व्यक्तीची कोरोना चाचणी करायला सांगितली. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर एक पोलिस आणि दोन कर्मचारी त्या कुटुंबाच्या मदतीला पाठवले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव खेडकर यांच्या सहकार्याने 2 मुली, 2 सुना आणि नात यांनी अंत्यविधी करत समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com