

Amit Shah Visits Bharat Forge Pune Plant
esakal
पुणे : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी रविवारी (ता. १५) पुण्यातील कल्याणी समूहाच्या ‘भारत फोर्ज’ कारखान्याला भेट दिली. या वेळी त्यांनी कंपनीच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष स्मृतिफलकाचे अनावरण केले. तसेच ‘उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स’साठी (यूपी-एसटीएफ) तयार करण्यात आलेल्या ५.५६x४५ मिमी रायफल्सच्या पहिल्या तुकडीला शहा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.