
पुण्याची भूमी ही स्वराज्याच्या संस्काराचे उगमस्थान आहे, शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले. मराठा साम्राज्याचे तुकडे झाल्यानंतर पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले, अफगाणिस्तानपासून बंगाल कटकपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला, थोरले बाजीराव पेशवे 41 युद्धे लढले पण एकही हारले नाहीत. निजामाविरुद्ध पालखेडचा मराठ्यांचे युद्ध अविश्वसनीय होते असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील एनडीएत काढले. थोरले बाजीराव पेशवे पुतळा अनावरण कार्यक्रमात शहा बोलत होते.