अमित ठाकरेंचा मराठमोळा अंदाज; कासरा हातात घेऊन हाकली बैलगाडी

Amit Thackeray seat Bullock cart in savardari Khed pune
Amit Thackeray seat Bullock cart in savardari Khed pune

आंबेठाण : सावरदरी (ता.खेड) येथे मनसेच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या अमित ठाकरे यांचा एक वेगळा अंदाज ग्रामस्थांना अनुभवायला मिळाला. कार्यक्रम स्थळी जाण्याअगोदर ज्या ठिकाणी त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तेथून त्यांनी बैलगाडीत बसून प्रवास केला.

जवळपास तीनशे ते चारशे मीटर अंतर त्यांनी बैलगाडीचे सारथ्य केले. विशेष म्हणजे स्वतः त्यांनी हातात कासरा पकडून बैलगाडी हाकली. यावेळी त्यांनी डोक्यावर भगवान टोपी घातली होती तर डोळ्यावर काळा गॉगल असल्याने त्यांचा एक हटके अंदाज नागरिकांना अनुभवायला मिळाला. यावेळी त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती.

शेतकरी आंदोलनाच्या झळा आंतरराष्ट्रीय पातळीवर; रिहानाच्या ट्विटनंतर मोदी सरकारचं भलं मोठं उत्तर​

कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र वागस्कर, मनोज चव्हाण, जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, अझर शेख, तालुकाध्यक्ष संदीप पवार, मंगेश सावंत, सचिन चिखले, मनोज खराबी, भरत तरस, संदीप मेंगळे, मीरा कदम, नीता शेटे, ताराबाई शेटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संदीप पवार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com