रॉक २७ १५ वर्षाखालील मुली क्रिकेट

रॉक २७ १५ वर्षाखालील मुली क्रिकेट
Published on: 

फोटो ः अमिता आर्या

अमिता, इलिनाची अर्धशतके

पुणे, ता. ३१ ः रॉक २७ स्पोर्ट्स अकादमी आयोजित पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटाच्या रॉक २७ करंडक क्रिकेट स्पर्धेत अमिता आर्या आणी इलिना त्यागीने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर एस. पी. इलेव्हनने स्पेशलाइज क्लबचा ९९ धावांनी पराभव केला.
सहारा क्रिकेट मैदानावर झालेल्या लढतीत एस. पी. इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना सहा बाद २१८ धावा केल्या. या वेळी अमिता आर्याने ५० चेंडूंत पंधरा चौकारांसह ८३ धावांची, तर इलिना त्यागीने ४४ चेंडूंत सात चौकार व तीन षटकारांसह केलेली ७६ धावांची खेळी उपयुक्त ठरली. अन्विरा उपाध्ये व ओवी देशमुखने प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तर देताना स्पेशलाइज क्लबने सात बाद ११९ धावा केल्या. ‘सामनावीर’ हा मान अमिता आर्याने मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः
एस. पी. इलेव्हन - (२५ षटकांत) ६ बाद २१८ (अमिता आर्या ८३, इलिना त्यागी ७६, अफझू शेख २०, अन्विरा उपाध्ये २-६, ओवी देशमुख २-१५) विजयी विरुद्ध स्पेशलाइज क्लब - (२५ षटकांत) ७ बाद ११९ (स्पृहाराजे भोसले ३३, कार्तिकी भुजबळ १-१, इलिना त्यागी १-८).
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.