"टॉप फाईव्ह"बाबत खासदार अमोल कोल्हे म्हणतात, आनंदाबरोबरच जबाबदारीचीही जाणीव

डी. के. वळसे पाटील
सोमवार, 22 जून 2020

सतराव्या लोकसभेच्या प्रथम वर्षातील देशातील खासदारांच्या कामगिरीचा परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या अभ्यास अहवालात देशातील सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या "टॉप फाईव्ह" खासदारांमध्ये डॉ. कोल्हे यांनी २०२ प्रश्न विचारुन दुसरे स्थान पटकावले.

मंचर (पुणे) : परिवर्तन संस्थेच्या अभ्यास अहवालात लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या "टॉप फाईव्ह" खासदारांमध्ये माझा समावेश झाला, ही माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. हा शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचाच सन्मान आहे. जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करू शकलो, याचा मला विशेष आनंद आहे, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

 पुण्यातील दोन खासदार टाॅप फाईव्ह परफाॅर्मर 
 

सतराव्या लोकसभेच्या प्रथम वर्षातील देशातील खासदारांच्या कामगिरीचा परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या अभ्यास अहवालात देशातील सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या "टॉप फाईव्ह" खासदारांमध्ये डॉ. कोल्हे यांनी २०२ प्रश्न विचारुन दुसरे स्थान पटकावले. त्या संदर्भात डॉ. कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

ते म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे पहिल्याच वर्षांत मतदारसंघातील रखडलेला पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गासह रखडलेली रस्त्यांची कामे, आदिवासी क्षेत्रात राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारणे यासह शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बैलगाडा शर्यत बंदीबाबत व छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला जतन व संवर्धन करणे, अशा अनेक विषयांवर आवाज उठविण्याचे काम केले. 

सलग सोळाव्या दिवशीही इंधन दरवाढीचे मीटर सुसाट

सतराव्या लोकसभेत केलेल्या पहिल्याच भाषणाची दखल खुद्द पंतप्रधान मोदी यांनी घेतली. देशाच्या, राज्याच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न मांडण्याचा शब्द मी जनतेला दिला होता, तो मी पूर्ण करू शकलो, हीच माझी मोठी उपलब्धी आहे, असे मला वाटते. या पुढील काळातही मी देशाच्या, राज्याच्या आणि मतदारसंघातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न मांडत राहणार, हे मी आवर्जून सांगू इच्छितो, असे डॉ. कोल्हे म्हणाले. 

खरिप हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांची कोंडी

आमचे नेते व राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवारसाहेब यांचे मार्गदर्शन आणि आमच्या सभागृहातील नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांच्या मार्गदर्शनाचा यासाठी नक्कीच फायदा झाला. हे माझ्या टीमचं यश आहे. पहिल्याच टर्मच्या पहिल्याच वर्षी ही गोष्ट साध्य करता आली. त्यामुळे आनंदाबरोबरच जबाबदारीची एक जाणीवही माझ्या मनात आहे. म्हणूनच हा शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचा सन्मान आहे.
 - डॉ. अमोल कोल्हे, खासदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amol Kolhe says, Top Five brings a sense of responsibility along with happiness