हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांची कोंडी; काय ते वाचा सविस्तर

Agrowon
Agrowon

पुणे - खरिपाच्या पेरणीलाच शेतकऱ्यांना महत्त्वाच्या खतांचा तुटवडा, लिंकिंग, जादा दराने विक्रीचे अनुभव येत आहेत. काही ठिकाणी बोगस खते माथी मारली जात असून खरेदीच्या पावत्या दिल्या जात नसल्याच्या शेतकरी तक्रारीही आहेत. आवश्‍यक खते मिळत नसल्याने हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. कृषी विभागाने थेट बांधावर खते देण्याची घोषणा केली असली तरी, बांधावर दूरच दुकानातही खते मिळत नसल्याची स्थिती सध्या आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृषी विभागाने राज्यात बांधावर खत योजना राबविली, मात्र त्याला खूप मर्यादा होती. बहुसंख्य शेतकऱ्यांना अपेक्षित खत मिळत नसल्याची स्थिती आहे. युरियाचा मोठा तुटवडा सध्या राज्यात आहे. राज्यातील सर्वच भागांत या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

नाशिक जिल्ह्यात खतांच्या टंचाईसोबत दरवाढीचा सामना करावा लागत आहे. सांगली जिल्ह्यातील तालुक्‍याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांना खताच्या मूळ किमतीच्या पन्नास ते शंभर रुपये जादा दराने खरेदी करावी लागत असून पक्‍क्‍या बिलाऐवजी कच्चे बिले देत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात खरिपाच्या प्रारंभीच गावोगावी खतांची टंचाई निर्माण झाली. अनेक ठिकाणी लिंकिंगचे ही प्रयत्न झाले. 

खानदेशात लिंकिंगचे प्रकार 
खानदेशात हव्या त्या खतांसाठी शेतकऱ्यांना वणवण फिरावे लागत आहे. त्यातच विक्रेते जादा दर आकारल्याची पावती देत नाहीत. 

मराठवाड्यात वणवण
मराठवाड्यातही खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची वणवण वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यात डीएपीचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातो आहे. हे खत जाते कुठे, हा प्रश्न आहे. विदर्भात बहुतांश शेतकऱ्यांना बांधावर खते मिळाली नाहीत. उलट खते टंचाईआड बोगस खते खपविण्याचा प्रयत्न निविष्ठा तस्करांकडून होत  आहे.

युरिया हवा तेवढा मिळत नाही. संयुक्त खते पुरेशी आहेत. काही भागांत युरियासाठी जादा दर आकारले जातात. तशी पावती कारवाईच्या धाकाने विक्रेते देत नाहीत. शेतकरी तक्रार करतील तरी कुठे? 
- रमेश पाटील, शेतकरी, शहादा, जि. नंदुरबार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com