
MPSC Exam
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नुकतीच ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५’ या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीत चार संवर्गांसाठी एकूण ९३८ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या जाहिरातीमध्ये ‘सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक’ (एएमव्हीआय) या पदाचा पुन्हा एकदा समावेश न झाल्याने स्पर्धा परीक्षार्थींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सलग पाच वर्षांपासून या पदासाठी एकही जाहिरात निघाली नसल्याने हजारो उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.