गिफ्ट पडले आठ लाखांना! महिलेची ऑनलाईन फसवणूक

दरलँडमध्ये डॉक्टर असल्याचे सांगत आरोपीने महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवत आठ लाख रुपयांची फसवणूक केली
Online Fraud
Online Fraudसकाळ डिजिटल टीम
Updated on

ऑनलाईन भामट्याने पुण्याच्या एका महिलेची आठ लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेदरलँडमध्ये डॉक्टर असल्याचे सांगत आरोपीने महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवत आठ लाख रुपयांची फसवणूक केली.यावर आता पिडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. (An online fraudster cheated a Pune woman of Rs 8.2 lakh on a false promise to marry her.)

Online Fraud
वऱ्हाड झोपेत असताना दरीत कोसळली बस; 7 जणांचा मृत्यू, 45 जखमी

पोलिसांनी सांगितले की ऑनलाईन आरोपीने पिडित महिलेला आपण आम्सटरडॅम नेदरलँड्स येथील डॉक्टर असून स्वत:ची ओळख आरव माहीप सांगितली. गेल्या महिन्यात त्याने ऑनलाईनच्या माध्यमातून पिडित महिलेशी ओळख निर्माण केली. एवढचं नाही तर आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी अधिक संपर्क साधला.

Online Fraud
पुणे : ‘पॉवर’ विना ११० ई-बस डेपोतच

ऑनलाईन फसवणूकर्त्याने पिडित महिलेला तिला तिच्यासाठी गिफ्ट पार्सल पाठवले असल्याचे सांगितले.त्यानंतर स्वत:ची पूजा शर्मा अशी ओळख असलेल्या एका महिलेने पिडित महिलेला फोन केला की गिफ्ट पार्सल दिल्लीतील कस्टम विभागाने जप्त केले आहे आणि ते गोळा करण्यासाठी तिला काही पैसे द्यावे लागतील.

पिडित महिलेला ‘पूजा राय’ आणि ‘लिजानो’ या दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले.महिलेने अनेक ऑनलाइन व्यवहारांद्वारे या बँक खात्यांमध्ये एकूण 8,21,800 रुपये ट्रान्सफर केले, मात्र तिला गिफ्ट पार्सल मिळाले नाही.त्यावरुन तिला तीची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने तात्काळ वाकड पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली.पोलिस या प्रकरणी तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com