पी. व्ही. सिंधू, आनंद महिंद्रा पद्मभूषण; वाचा पद्मविभूषण पुरस्कार मिळालेल्यांची नावे 

टीम ई-सकाळ
Saturday, 25 January 2020

उद्योगपती आनंद महिंद्रा, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर (मरणोत्तर), बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आदींचा पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी केंद्र सरकारकडून विविध पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर), भाजपचे चाणक्‍य आणि रणनितीकार अरूण जेटली (मरणोत्तर), भाजपच्याच फायब्रॅंड नेत्या सुषमा स्वराज (मरणोत्तर) यांच्याप्रमाणेच मुष्टीयोद्धा मेरी कोम हिला पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उद्योगपती आनंद महिंद्रा, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर (मरणोत्तर), बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आदींचा पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक सेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकीय सेवा, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदाच मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित विशेष समारंभामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. यंदा 141 जणांना पद्मपुरस्कार जाहीर झाले असून, काहींना संयुक्तपणे हे पुरस्कार देण्यात आले आहेत. सातजणांना पद्मविभुषण, सोळाजणांना पद्मभूषण आणि 118 जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले आहेत. या पुरस्कार विजेत्यांमध्ये 34 महिलांचाही समावेश आहे. बाराजणांना मरणोत्तर हे पुरस्कार प्रदान केले जातील.

पद्मश्री विजेत्यांची बातमी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पद्मविभूषण 

 • जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर) 
 • अरूण जेटली (मरणोत्तर) 
 • सर अनेरूड जुगनॉथ जीसीएसके कोम 
 • छन्नुलाल मिश्रा 
 • सुषमा स्वराज (मरणोत्तर) 
 • विश्‍वेशतीर्थ स्वामीजी (मरणोत्तर) 

पद्मश्री विजेत्यांची बातमी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पद्मभूषण 

 • एम. मुमताज अली 
 • सय्यद मुआज्जीम अली (मरणोत्तर) 
 • मुझफ्फर हुसैन 
 • अजय चक्रवर्ती (कला) 
 • दास (साहित्य आणि शिक्षण) 
 • बालकृष्ण दोषी (अभियांत्रिकी) 
 • कृष्णाम्मल जगन्नाथन (समाजसेवा) 
 • एस.सी.जमीर 
 • अनिल प्रकाश जोशी, (समाजसेवा) 
 • त्सेरिंग लॅंडोल (वैद्यकीय) 
 • आनंद महिंद्रा (व्यापार आणि उद्योग) 
 • नीळकंठ मेनन (मरणोत्तर) 
 • मनोहर पर्रीकर (मरणोत्तर) 
 • जगदीश सेठ (साहित्य आणि शिक्षण) 
 • पी. व्ही. सिंधू (क्रीडा) 
 • वेणू श्रीनिवासन (व्यापार आणि उद्योग) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anand mahindra p v sindhu got padma bhushan award