esakal | खळद येथे आनंदी जम्बो कोविड केअर सेंटर सुरू

बोलून बातमी शोधा

covid centre
खळद येथे आनंदी जम्बो कोविड केअर सेंटर सुरू
sakal_logo
By
योगेश कामथे

खळद : खळद (ता. पुरंदर) येथे माऊली गार्डन मंगल कार्यालयात आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून ग्रामीण संस्थेच्या वतीने २०० बेडची क्षमता असणारे ऑक्सिजनयुक्त आनंदी जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून याचे उद्घाटन दौंड-पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संजय जगताप, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी विवेक आबनावे, गटविकास अधिकारी अमर माने, वीना सोनवणे, पाणी पंचायतीच्या डॉ. सोनाली शिंदे, सासवड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उत्तम तपासे, डॉ. किरण राऊत, डॉ. प्रविण जगताप, जि. पण. सदस्य दत्तात्रेय झुरंगे, गणेश जगताप, नंदकुमार जगताप, राजेश काकडे, अमित झेंडे, महेश खैरे, योगेश कामथे, बाळा कादबाने आदी उपस्थित होते.

हेही वाचा: प्लाझ्मा तुटवडा रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांना एफडीएचे आदेश

दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असताना या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून जनतेला दिलासा मिळेल व शासनाच्या वतीने येथे ३ डाॅक्टर, ७ नर्स उपलब्ध करून दिल्या जातील असे प्रमोद गायकवाड यांनी सांगितले तर ग्रामीण संस्था सतत जनतेच्या मदतीसाठी काम करीत असून आजही कोरोनाची परीस्थिती गंभीर असताना नागरीकांना तात्काळ उपचार व्हावेत यासाठी हे सेंटर सुरू केले असून येथे १५० आयसोलेशन बेड, ५० ऑक्सिजन बेड,६ डाॅक्टर, ३६ नर्स, व इतर कर्मचारी, औषोधोपोचार, नाष्टा, पौष्टीक आहार, मनोरंजक, मेडीटेशन, योगा आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा: जुन्नर तालुक्यात ऑक्सिजन सिलेंडरची तीव्र टंचाई

"याबरोबरच शनिवारपासून वीर येथे देवस्थानच्या वतीने, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निरा येथेही कोविड केअर सेंटर सुरु होत असून हवेलीतील उरुळी आणि आंबेगाव येथेही लवकरच कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगत शासन आपल्या स्तरावरती सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, अशावेळी नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतःच घेणे गरजेचे असून शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर गावाबाहेर जाऊ नये, तरुणांनी कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले. या सेंटरची सर्व व्यवस्था ग्रामीण संस्थेचे संचालक अनिल उरवणे, डॉ. सुमित काकडे, मुन्ना शिंदे यांच्यावर सोपवली आहे.