esakal | पहिलीच्या वर्गातील अनायशाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Anayasha Karing

पहिलीच्या वर्गातील अनायशाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - इयत्ता पहिलीच्या वर्गात शिक्षण (Education) घेत असलेल्या पुणे शहरातील (Pune City) साडेसहा वर्षीय अनायशा अनिश केऱींग (Anayasha Karing) या विद्यार्थिनीने (Girl Student) सर्वात मोठ्या अक्षरांचे इंग्रजी शब्द पाठांतर करण्याचा नवा विक्रम (Record) केला आहे. तिच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली आहे. इंग्रजी भाषेतील सर्वाधिक कठीण व मोठ्या अक्षरांचे दहा शब्द अक्षर (स्पेलिंग) व उच्चारासह पाठांतर करणारी अनायशा ही देशातील सर्वात कमी वयाची पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.

अनायशा ही पुण्यातील सेंट मेरी स्कूलमध्ये पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. याआधी चार वर्षाची असताना तिने अनुक्रमे मुंबई आणि हैदराबाद येथे झालेल्या रूबिक क्यूब्सच्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. अनायशाने किमान २१ आणि कमाल ४५ अक्षरांचे इंग्रजी शब्द उच्चारासह पाठ केले आहेत. खास मुलांसाठी असलेल्या न्यूजशुट्टल या वृत्तपत्राने तिची मुलाखत घेतली आहे.

अनायशाची आई शलाका या स्मरणशक्ती आणि बुद्ध्यांक सक्षमीकरणासाठीच्या प्रशिक्षक (ब्रेन आणि मेमरी कोच) आहेत. वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. अनायशाच्या यशात तिची आई शलाका यांचा सिंहाचा वाटा असल्याचे वडील अनिश यांनी सांगितले.

loading image
go to top