Absconding Gang Member Arrested After Two Years
sakal
पुणे : शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – २ ने आंदेकर टोळीभोवती कारवाईचा फास आवळला आहे. विविध दाखल गुन्ह्यातील हवा असलेला व आंदेकर टोळीचा सदस्य गणेश ऊर्फ सूरज अशोक वड्डा (वय ३०, रा. मंगळवार पेठ) याला कोल्हापूर येथून सापळा रचून ताब्यात घेतले. गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. तो सध्या कोल्हापूर येथील भुदरगड येथे असल्याची माहिती पोलिस उप निरीक्षक गौरव देव व पोलिस अंमलदार दिलीप गोरे यांना मिळाली होती.