Pune: आणे येथे ३५ वर्षीय तरुणाचा जीव गेला; बुधवारी पहाटे घटना घडली असून संबंधित आरोपीला स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

Young Farmer Tragedy in Ane Village: जुन्नर तालुक्यातील आणे येथे तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे
Police investigation after 35-year-old man's murder in Aane village

Police investigation after 35-year-old man's murder in Aane village

esakal

Updated on

राजेश कणसे

आळेफाटा: याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आणे (जुन्नर)या ठिकाणी रहात असलेले तुषार रामदास दाते (वय ३५) हे तरुण शेतकरी आज बुधवार दि.८ रोजी नेहमीप्रमाणे पहाटे घराजवळच असलेल्या जनावरांच्या गोठ्यात गाईंना चारा टाकण्यासाठी गेले होते व गाईंना चारा टाकत असताना या ठिकाणी आधीपासूनच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्याने त्यांच्यावर धारदार सुऱ्याने अचानक सपासपा वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले तुषार रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com