Aniket Sudhir Shinde
Aniket Sudhir Shindeesakal

शेतकऱ्याच्या पोराची कमाल! आंबेगाव तालुक्यातील अनिकेत शिंदेची प्रशासकीय अधिकारीपदी निवड

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ऑक्टोबर २०२३ मधे ही परीक्षा घेण्यात आली.
Published on
Summary

अनिकेत शिंदे हा क्रीडा क्षेत्रात पारंगत असून त्याने राज्यस्तरीय वुशू व बॉक्सिंग खेळात पाच वेळा सुवर्ण पदक पटकावले आहे.

पारगाव : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अनिकेत सुधीर शिंदे याची महाराष्ट्र नगरपरिषद कर व प्रशासकीय सेवा मधून कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदी निवड झाली आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ऑक्टोबर २०२३ मधे ही परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे सोमवार (दि. १०) जून रोजी लागला. त्यामधून त्याची महाराष्ट्र नगरपरिषद कर (Maharashtra Municipal Council Tax) व प्रशासकीय सेवा मधून कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

Aniket Sudhir Shinde
Hasan Mushrif : शेतकऱ्यांना भूमिहीन बनविणारा 'हा' महामार्ग रद्द करावा लागेल; कोणत्या महामार्गाबाबत बोलले मुश्रीफ?

अनिकेत शिंदे हा क्रीडा क्षेत्रात पारंगत असून त्याने राज्यस्तरीय वुशू व बॉक्सिंग खेळात पाच वेळा सुवर्ण पदक पटकावले आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करुन त्याने अनेक पदके जिंकली आहेत. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण हे गावातीलच विद्या विकास मंदिर विद्यालयात झाले.

उच्च माध्यमिक शिक्षण सैनिकी शाळा (फुलगाव) येथून झाल्यानंतर त्याने पुणे शहरातील सर परशुराम महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी संपादन केली. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करून हे यश प्राप्त केले. त्याचे वडील सुधीर सखाराम शिंदे हे एक प्रगतशील शेतकरी आहेत. अनिकेत त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या आई-वडिलांना देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com