Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात ७ महिन्यांच्या चिमुकल्याला आईने दिले जीवदान!

देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे मेंढपाळ कुटुंबाला आली
animal attack mother saves her 7 month child from leopard attack forest department pune marathi news
animal attack mother saves her 7 month child from leopard attack forest department pune marathi newsSakal

निरगुडसर : देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे मेंढपाळ कुटुंबाला आली, सात महिन्यांच्या चिमुकल्या देवाचा हात अंथरूणाच्या बाहेर आला आणि दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप मारून हात पकडला, मुलावर बिबट्याने केलेला हल्ला आईला वेळीच आलेल्या जागेमुळे परतला आणि बिबट्याच्या जबड्यातून देवाला आईने सुखरूप खेचलं, मुलाच्या गळ्याला,हाताला,पोटाला दात आणि पंजा लागला आहे.

बुधवारी पहाटे दोन वाजता थोरांदळे येथील फुटाणे मळा येथे घटना घडली.स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मुलाला मंचर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. थोरांदळे ता.आंबेगाव येथील फुटाणे मळा येथे सुखदेव फुटाणे यांच्या शेतात धोंडीभाऊ करगळ या मेंढपाळाचा वाडा बसलेला होता,मेंढपाळ करगळ यांची पत्नी सोनल करगळ ही तिच्या सात महिन्याच्या मुलाला देवा याला घेऊन वाड्याच्या शेजारीच बाहेर झोपली होती.

रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुलाचा हात अंथरूनाच्या बाहेर पडला होता,त्याचवेळी बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला,त्यावेळी आई सोनल करगळ यांना जागा आली असता तिने मुलाला ओढत बिबट्याचा प्रतिकार सुरू करत एका हाताने बिबट्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तर एका हाताने मुलाला वाचवण्यासाठी धडपड सुरू केली व जोरजोरात आरडा ओरडा केला.

त्यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्य बाहेर येत त्यांनी जोरजोरात आरडाओरडा केला आणि बिबट्याने धूम ठोकली,यावेळी देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती कुटुंबाला आली.या हल्ल्यात सात महिन्याचा मुलगा देवा धोंडीभाऊ करगळ याच्या हाताला दात लागला असून पोटाला नख्या लागल्या आहेत.

animal attack mother saves her 7 month child from leopard attack forest department pune marathi news
Pune News : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍पाचा सव्वा चारशे कोटीचा आराखडा केंद्राकडे

घटनेची माहिती कळताच स्थानिक शेतकरी सागर विश्वासराव, प्रकाश फुटाणे यांनी मेंढपाळ कुटुंब यांना धीर देत मुलाला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रुग्णालयात लस नाही असे सांगून मुलाला ससून येथे नेण्यात यावे असे सांगण्यात आले.

बुधवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी सकाळीच घटनास्थळी भेट देत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता रुग्णालय प्रशासनाच्या वतीने लस उपलब्ध करून देण्यात आली.

सध्या मुलावर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मंचर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. ही घटना घडल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले असता कोणीही तातडीने घटनास्थळी आले नाही यामुळे वनविभागाला घटनेचे किती गांभीर्य आहे हे दिसून येते.

आंबेगाव तालुक्यात या फुटाणे मळा शेजारीच भराडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या दोन महिन्यात चार कालवडी, चार शेळ्या ठार झाल्या आहेत, येथील भराडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडून पत्र दिले तरी देखील आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारून पिंजरा लावतो अशी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी करून देखील अद्याप वनविभागाला जाग येत नाही, जुन्नर तालुक्यातील आळे येथील घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा मृत्यु होण्याची वाट वनविभाग पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com