katraj zoological park
sakal
पुणे - कात्रज येथील महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील खंदकांमध्ये जमा झालेले पाणी वेळोवेळी बदलले जात नसल्याने प्राण्यांना धोका होत आहे. त्यामुळे पाणी बदलण्याची व्यवस्था करा असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्राणी संग्रहालय प्रशासनाला दिले. दरम्यान, प्राणी संग्रहालय अतिशय सुंदर असले तरी प्राण्यांची संख्या कमी आहे, ती संख्या वाढविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.