esakal | Pune : अनिसच्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

pune

अंनिसच्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आगरकर पुरस्कार डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना, तर जीवनगौरव पुरस्कार प्रा. प्रभाताई पुरोहित (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. समाजात किंवा चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या विविध कार्यकर्त्यांना अंनिसचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. लवकरच एका कार्यक्रमात हे सर्व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जातील, अशी माहिती अंनिसचे कार्यकर्ते प.रा.आर्डे, राहुल थोरात,फारुख गवंडी,वाघेश साळुंखे, बाबुराव जाधव, डॉ.संजय निटवे यांनी एका प्रसिद्धीपत्रका व्दारे दिली.

आगरकर पुरस्कारप्राप्त डॉ. लवटे यांनी आजवर अनेक पुस्तके लिहिली आहेत, ग्रंथ संपादन केले आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील हिंदी खंड प्रकल्पाचे ते संपादक आहेत. तसेच डॉ. लवटे सरांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची सर्व पुस्तके हिंदीत भाषांतरित करून घेऊन त्यांचे संपादन केले आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या कामामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे विचार-साहित्य देशभर पोचले आहे.

‘जीवनगौरव पुरस्कार’ यावर्षी मुंबई येथील ‘अंनिस’च्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रा. पुरोहित यांना जाहीर करण्यात आला आहे. अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयातून निवृत झाल्यानंतर गेली २० वर्षे ‘अंनिस’च्या कामात सक्रिय आहेत.

अनिसचे इतर पुरस्कार

  1. सुधाकर आठल्ये ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार - संतराम कर्हाड (अंबाजोगाई) आणि मा.वसंतराव टेंकाळे(लातूर)

  2. सुधाकर आठल्ये युवा कार्यकर्ता पुरस्कार - उदयकुमार कुर्हाडे (येवला)

  3. सावित्रीमाई फुले पुरस्कार - विजयाताई चंद्रकांत श्रीखंडे (नागपूर)- भटक्या-विमुक्त जाती-जमाती प्रबोधन पुरस्कार - विनायकराव चव्हाण (इचलकरंजी)

loading image
go to top