

नीरा नरसिंहपूर, ता. ११ : लक्ष्मी नृसिंह आध्यात्मिक गुरूकुल वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अंकुश रणखांबे महाराज यांना पंढरपूर येथील वारकरी संप्रदायातील मानाच्या ‘पंढरी वारकरी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अंकुश रणखांबे यांनी आध्यात्मिक, सामाजिक कार्य, वारकरी संप्रदायाची अखंड कीर्तन सेवा, ५० गावात सुरू केलेले अखंड हरिनाम सप्ताह तसेच नरसिंहपूर येथे वारकरी संस्था स्थापन आदी कार्ये केली आहेत. ते नृसिंह मंदिरात जयंती नवरात्र उत्सवात १९ वर्षे ‘काल्याची कीर्तन सेवा’ करीत आहेत. यासर्व धार्मिक उपक्रमाचा आढावा घेऊन त्यांना पंढरपूरचा ‘पंढरी वारकरी भूषण पुरस्कार देण्यात आला आहे.